1) ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
A) साहित्य क्षेत्र
B) क्रीडा क्षेत्र
C) संरक्षण क्षेत्र
D) पत्रकारिता क्षेत्र
उत्तर: A) साहित्य क्षेत्र
2.दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A) क्रिकेट
B) तिरंदाजी
C) नेमबाजी
D) कुस्ती
उत्तर: B) तिरंदाजी
3.अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण?
A) नील आर्मस्ट्राँग
B) युरी गागरीन
C) राकेश शर्मा
D) कल्पना चावला
उत्तर: B) युरी गागरीन
4.संयुक्त राष्ट्र संघटनेने महाराष्ट्रातील कोणत्या योजनेची दखल घेतली आहे?
A) महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम
B) इंदिरा आवास योजना
C) स्वावलंबन योजना
D) संजय गांधी निराधार योजना
उत्तर: A) महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम
5.‘To The Last Bullet’ हे पुस्तक कोणावर आधारित आहे?
A) हेमंत करकरे
B) संदीप उन्नीकृष्णन
C) विजय साळसकर
D) अशोक कामटे
उत्तर: D) अशोक कामटे
6.जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो?
A) ८ मार्च
B) १ डिसेंबर
C) २८ सप्टेंबर
D) ८ सप्टेंबर
उत्तर: D) ८ सप्टेंबर
7.सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे?
A) हत्ती
B) पाणघोडा
C) जिराफ
D) निळा देवमासा
उत्तर: D) निळा देवमासा
8.‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत कोणी लिहिले आहे?
A) प्रदीप
B) इकबाल
C) सलील
D) मजरूह सुलतानपुरी
उत्तर: A) प्रदीप
9.डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A) टेनिस
B) टेबल टेनिस
C) बॅडमिंटन
D) फुटबॉल
उत्तर: A) टेनिस
10. देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे?
A) वीरचक्र
B) भारतरत्न
C) परमवीर चक्र
D) पद्मभूषण
उत्तर: C) परमवीर चक्र
11. ‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून कोण ओळखली जाते?
A) युसुफ पठाण
B) कविता राऊत
C) शोएब अख्तर
D) यापैकी नाही
उत्तर: B) कविता राऊत
12. भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली?
A) 1961
B) 1951
C) 1971
D) 1952
उत्तर: B) 1951
13. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम महाराष्ट्रात कधी सुरू झाली?
A) 15 ऑगस्ट 2007
B) 26 जानेवारी 2007
C) 15 ऑगस्ट 2008
D) 26 जानेवारी 2008
उत्तर: A) 15 ऑगस्ट 2007
14. ‘क्रांती मैदान’ कोणत्या शहरात आहे?
A) मुंबई
B) नागपूर
C) दिल्ली
D) कलकत्ता
उत्तर: A) मुंबई
15. कांदा-बटाट्यांना कोंब फुटू नयेत म्हणून कोणत्या किरणांचा वापर होतो?
A) अल्फा
B) बीटा
C) गॅमा
D) क्ष-किरण
उत्तर: C) गॅमा
16. खालीलपैकी कोणते ठिकाण नवी दिल्लीमध्ये नाही?
A) राजघाट
B) शक्तिस्थळ
C) विजयघाट
D) आनंदभवन
उत्तर: D) आनंदभवन
17. सन 1848–1856 दरम्यान अनेक राज्ये खालसा कोणी केली?
A) लॉर्ड डलहौसी
B) लॉर्ड कॉर्नवॉलीस
C) लॉर्ड बेंटिक
D) लॉर्ड वेल्सली
उत्तर: A) लॉर्ड डलहौसी
18. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली?
A) भारत
B) इंग्लंड
C) दक्षिण आफ्रिका
D) पाकिस्तान
उत्तर: C) दक्षिण आफ्रिका
19. मानवी जठराचा आकार इंग्रजीतील कोणत्या अक्षरासारखा असतो?
A) A
B) K
C) J
D) यापैकी एकही नाही
उत्तर: C) J
20. मानवी हृदय किती कप्प्यांचे बनलेले आहे?
A) दोन
B) तीन
C) चार
D) यापैकी एकही नाही
उत्तर: C) चार
21. माधवराव पेशव्यांनी निजामाला कोणत्या ठिकाणी पराभूत केले?
A) आपेगाव
B) खर्डा
C) राक्षसभुवन
D) श्रीरंगपट्टण
उत्तर: C) राक्षसभुवन
22. दंतक्षय रोखण्यासाठी कोणते खनिज महत्त्वाचे आहे?
A) सोडियम
B) आयोडीन
C) फ्लोरिन
D) लोह
उत्तर: C) फ्लोरिन
23. भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत?
A) अमित शहा
B) नरेंद्र मोदी
C) निर्मला सीतारामन
D) राजनाथ सिंग
उत्तर: D) राजनाथ सिंग
24. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
A) बिहार
B) आसाम
C) पश्चिम बंगाल
D) उत्तर प्रदेश
उत्तर: B) आसाम
25. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना कोणी केली?
A) महात्मा गांधी
B) सुभाषचंद्र बोस
C) बाळ गंगाधर टिळक
D) जवाहरलाल नेहरू
उत्तर: C) बाळ गंगाधर टिळक